आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' प्रदर्शनासाठी सज्ज

    15-Aug-2024
Total Views |

sholay  
 
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला "शोले" या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे.
 
'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाच्या नावातूनच "शोले" या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं. चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, बालकलाकार श्रीरंग महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून अभिनेते समीर धर्माधिकारी व आनंद इंगळे हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत आहेत.
 
"शोले" चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच "शोले" चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. "शोले" चित्रपटाच्या याच आठवणींना "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा चित्रपट सलाम करणार आहे.