"चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी..."; नितेश राणेंची अमोल कोल्हेंवर टीका

    15-Aug-2024
Total Views |
 
Amol Kolhe & Nitesh Rane
 
मुंबई : चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हेंवर केली आहे. अमोल कोल्हेंनी नितेश राणेंवर टीका केली होती. या टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
नितेश राणे म्हणाले की,"चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये. छत्रपती संभाजी महाराजांचे कपडे घातल्यावर कुणी संभाजी महाराज होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी अमोल कोल्हेंना संभाजीराजे कळतील त्यादिवशी त्यांना नितेश राणेंची भूमिकाही पटेल. संभाजी महाराजांनी धर्मांतराचा विरोध करण्यासाठी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. त्यामुळे तुम्ही जर त्यांची भूमिका करत असाल तर तुम्ही सर्वात आधी नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन केलं पाहिजे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पुढची १०० वर्षे विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार रहा!
 
ते पुढे म्हणाले की, "हिंदू म्हणून पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर आम्हाला तिथे न्याय मिळायला हवा. ज्यादिवशी हा न्याय मिळेल त्यादिवशी मी कुणाबद्दलही बोलणं बंद करेन. माझ्यासमोर अशा अनेक घटना येत आहेत. त्यामुळे मी हिंदूंची बाजू घेणं थांबवणार नाही," असेही ते म्हणाले.