"लाडकी बहिण, लाडका भाऊ झालं आता लाडकं..."; मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

    15-Aug-2024
Total Views |
 
Eknath Shinde
 
मुंबई : लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी झालं आता लाडकं सरकारसुद्धा लक्षात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. तसेच लाडकी बहिण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, असेही ते म्हणाले. ते गुरुवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधकांनी लाडकी बहिण योजनेला बदनाम करण्याचं काम केलं. ही योजना खोटी आणि फसवी आहे असं ते म्हणायला लागले. परंतू, त्यांच्याकडून चांगलं म्हणण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. ही योजना रद्द व्हावी म्हणून ते कोर्टातसुद्धा गेले. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला."
 
हे वाचलंत का? -  उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लुटला विविध खेळांचा आनंद! कोराडी तालुका क्रीडा संकुलाचे उद्धाटन संपन्न
 
"आनंदाच्या शिध्याविरोधातसुद्धा विरोधक कोर्टात गेले. तिथेसुद्धा त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. ते लोकं तुमच्याकडे येतील. पण ते आल्यावर त्यांना तुम्ही जोडा दाखवा. ते कोट्यावधी रुपयांमध्ये लोळणारे आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांना दीड हजार रुपयांचं मोल कळणार नाही," अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
 
सुप्रिया सुळेंच्या विधानाला प्रत्युत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "काही लोकं म्हणतात की, लवकर पैसे काढून घ्या. नाहीतर सरकार काढून घेईल. पण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. आमची देना बँक आहे, लेना बँक नाही. आधीचं सरकार हफ्ते घेणारं सरकार होतं आणि आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारं आहे. ही योजना कायम सुरु राहिल. त्यामुळे काळजी करू नका. लाडकी बहिण झाली, लाडका भाऊ झाला, लाडका शेतकरी झाला. पण आता तुम्ही लाडकं सरकारसुद्धा लक्षात ठेवा," असे आवाहन त्यांनी केले आहे.