लाडकी बहिण योजना! आतापर्यंत 'इतक्या' लाख बहिणींच्या खातात ३ हजार रुपये जमा

मंत्री अदिती तटकरेंची माहिती

    15-Aug-2024
Total Views |
 
Aditi Tatkare
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ८० लाखांहून अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
 
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, "१४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८० लाख महिलांच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाची ३ हजार रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांनासुद्धा १७ ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे."
 
हे वाचलंत का? -  अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत? कोण असेल नवा उमेदवार?
 
"ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून, सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत. दि. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाख महिलांची नोंदणी झाली आहे," अशी माहितीही अदिती तटकरेंनी दिली.