निक्की तंबोळीने ओलांडल्या मर्यादा, वर्षा ताईंच्या मार्तृत्वावरच उपस्थित केला प्रश्न

    14-Aug-2024
Total Views |

nikki and varsha  
 
 
 
मुंबई : सध्या मालिकाविश्वात एकाच शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे आणि तो म्हणजे मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन. पहिल्या एपिसोपासूनच निक्की तंबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यात ठिणग्या पडताना दिसल्या. बऱ्याचदा अतिशय चुकीच्या भाषेत निक्की वर्षा यांच्यासोबत बोलताना दिसली. पण आता तिने नुकत्याच बेबी टास्कमध्ये सर्व सीमा ओलांडल्या आहेत. वयानं मोठ्या असलेल्या सदस्यांचा अपमान करणं, त्यांना नको ते बोलणं यामुळं तिच्यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. यावेळी निक्कीने कहर करत वर्षा उसगांवकर यांना त्यांच्या मातृत्वावरून ऐकवलं आहे.
 
बिग बॉसने घरातील सदस्यांना बाहुल्यांचा सांभाळ करण्याचा टास्क दिला होता. पण स्पर्धकांनी टास्कमध्ये राडा घातला. निक्की आणि टीमनं तर सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. या टास्क दरम्यान, निक्कीनं विरुद्ध टीममधील बाहुलीचा पाय मोडल्याचं पाहायला मिळालं. यावर वर्षा यांनी म्हटलं की, निक्कीनं बाहुलीची मुंडी काय, तंगडंच तोडलं. यावर उत्तर देताना निक्की म्हणाली की, बघितल्या का यांच्या भावना? यांना आईचं प्रेम कसं समजेल ? जाऊदेत. निक्कीचं हे शब्द ,वर्षा ताईंच्या मातृत्वावर बोलणं घरातील इतर सदस्यांनाही खटकलं आहे.
 
दरम्यान, निक्कीच्या या वक्तव्यावर अंकिता वालावलकर भडकली असून तिने निक्की तू जे काही बोलली ते फार चुकीचं आहे. बिग बॉस आत्ताच म्हणाले की, हा खेळ मानवी भावनांचा आहे... तू वर्षा मॅमना हे जे काही बोलली ते सहन होणार नाही आणि त्यांच्या मातृत्तावर तर जाऊस नकोस, अशा शब्दांत सुनावलं आहे.
 
घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निक्कीने वर्षा ताईंची माफी मागितली वर्षा ताई किचनमध्ये होत्या, तेव्हा निक्की आली म्हणाली की, काल टास्क दरम्यान, जे काही बोलले, त्याबद्दल मला माफी मागायची आहे.मला तुमच्या समोर यायची हिंमत होत नव्हती. पण आता मी आलेय, माफी मागतेय. मला वाईट वाटलं. यावर वर्षा म्हणाल्या की, निक्की तू बोललीस ते अक्षम्य आहे पण, ठीक आहे. पण निक्कीच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षक संतापले असून निक्कीवर जोरदार टिका केली जात आहे.