लाडकी बहिण योजनेसंबंधी महत्त्वाची अपडेट! बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी...

मंत्री अदिती तटकरेंचे आदेश

    14-Aug-2024
Total Views |
 
Aditi Tatkare
 
मुंबई : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
 
येत्या १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे २ महिन्यांचे पैसे मिळणार आहे. पंरतू, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येत आहे. दरम्यान, या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.
 
हे वाचलंत का? -  या रक्षाबंधनाला 'खोटं न बोलण्याची' ओवाळणी द्या!
 
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्ट़ नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.