संजय राऊतांनी मित्रपक्षांना पुन्हा डिवचलं, म्हणाले, "महाराष्ट्रात ठाकरे २..."
13-Aug-2024
Total Views |
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे २ सरकार येणार आहे, असं वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीमधील घटकपक्षांची वेगवेगळी मतं असल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा मित्रपक्षांना डिवचल्याचं बोललं जात आहे.
संजय राऊत म्हणाले की, "महायूतीला लोकसभेचा सर्वेसुद्धा अनुकूल नव्हता. आता महाराष्ट्रातील सर्वेदेखील त्यांना प्रतिकूल आहे. आम्हाला कोणत्याही सर्वेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे २ सरकार येणार आहे आणि ते कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही कितीही पैसे वाटा, निवडणूकीच्या तोंडावर कितीही योजना आणा पण तुम्हाला निवडणूका वेळतच घ्याव्या लागतील," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसकडे एखादा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर नाना पटोलेंनी समोर येऊन सांगावं. आम्ही पटोलेंच्या चेहऱ्याचं स्वागत करू. ते आमचे मित्र आहेत. आम्ही त्यांची अडचण समजू शकतो. पण मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो आहे. नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे, याविषयी मी बोलत नाही," असेही ते म्हणाले.