मुंबई : अक्षय कुमार आणि श्रद्धा कपूर व राजकुमार राव एकमेकांसमोर लवकरच उभे ठाकणार आहेत. श्रद्धा कपूर, राजकूमार राव आणि पंकज त्रिपाठी यांचा 'स्त्री २' हा चित्रपट १४ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्त्री चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि आता ६ वर्षांनी दुसरा भाग येणार आहे. 'स्त्री २' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून यात आता चंदेरी गावात नवी दहशत पाहायला मिळणार आहे. तर १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा खेल खेल में हा चित्रपट प्रaदर्शित होणार असून या शर्यतीत प्रदर्शनापुर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ ने ॲडवान्स बुकींगमध्ये बाजी मारली आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत प्री बुकींगमध्ये स्त्री २ चित्रपटाची आत्तापर्यंत २०,२९३ तिकिटे विकली गेली असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ७५.१७ लाखांची कमाई केली आहे. परंतु, आता स्त्री २ चित्रपटाचा अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाला मोठा फटका बसणार असे दिसून येत आहे. गेला काही काळ अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यास अयशस्वी ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयचा सरफिरा चित्रपट आला होता पण तोही विशेष कामगिरी करु शकला नव्हता.
दरम्यान, १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' स्त्री २ प्रमाणे याही चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही सुरू झाले असून Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत १२०० तिकिटे विकली गेली असून ५.२९ लाख रुपये कमावले आहेत. आता प्रेक्षक नेमकी ‘स्त्री २’ आणि ‘खेल खेल में’ यापैकी कोँणत्या चित्रपटाला पसंती देतात हे पाहावं लागणार आहे.