"अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक, नोकरीचे आमिष दाखवून मुलीवर...
12-Aug-2024
Total Views |
लखनऊ (Nawab Singh) : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. पीडित युवतीने समाजवादी नेता नवाब हिंस यादवच्या महाविद्यालयात नोकरीची मागणी केली होती. यावेळी नवाब सिंहने पीडित युवतीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितीची आत्या त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी पीडितेच्या आत्याने याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल केली. ही घटना कनौज येथील कोतवाली नगर येथील समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंग यादव यांच्या महाविद्यालयात घडली आहे.
यावेळी नवाब सिंह यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती विद्यालयाबाहेर उभ्या असलेल्या पीडित युवतीच्या आत्याला समजली. त्यांनी ११२ या क्रमांकावर फोनद्वारे संपर्क साधून पोलिसांना बोलवले होते. पोलिसांना आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. आरोपीसोबत पीडित युवती आणि तिच्या आत्याला कोतवाली येथे आणण्यात आले. यावेळी पीडितेने नवाब सिंह विरोधात पॉक्सो अॅक्टसहित भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित युवतीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. तसेच आरोपी हा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादवचे निकटवर्तीय आहेत. अखिलेश यादव आणि नवाब सिंह यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवाब सिंहने यावर प्रतिक्रिया दिली,"माझ्यावर केलेले आरोप हे राजकीय षडयंत्र आहे", असा दावा त्यांनी केला. पोलीस ठाण्याबाहेर अनेक समर्थाकांनी गराडा घातला. यावेळी अनेकांनी नवाब सिंह यांच्या नावाने घोषणा दिल्या होत्या.
आयोध्येत समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान आणि त्याचा नोकर राजू खान यांनी अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आले होते. त्याचवेळी मोईद खान यांच्या बेकरीवर बुलडोर चढवण्यात आला. दरम्यान मोईद खान हे समाजवादी पक्षाचे नेते अवधेश प्रसाद यांचे निकटवर्ती आहेत. त्यांनी मोईद खानच्या निवडणुकीचा प्रचार केला होता, अशी माहिती प्रसारमाध्यांनी दिली आहे.