"बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार बंद करा", बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात कॅनडात मोर्चा
12-Aug-2024
Total Views |
टोरंटो (Bangladeshi Hindu) : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेशी आंदोलकांनी शेख हसीनांचे सरकार पाडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर बांगलादेशी कट्टरपंथींनी हिंदूंवर अन्याय, अत्याचार केले. बांगलादेशातील हिंदू देव देवतांचे मंदिर, पाडण्यात आले. हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. हिंदू महिला, तरूणींवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात १० ऑगस्ट रोजी कॅनडात मोर्चा काढून बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणावर प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रसारमाध्यमानुसार, कॅनडातील टोरंटो शहरात काही हिंदू युवक, युवती, महिला आणि वृद्धांनी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसेविरोधात मोर्चा काढला होता. टोरंटोच्या सिटी हॉलजवळ नॅथन फिलिप्स स्क्वेअर ठिकाणी टोरंटोमधील अनेकजण एका छताखाली आले आणि त्यांनी बांगलादेशी कट्टरपंथींचा विरोध केला. ‘प्रोटेक्ट द हिंदू ऑफ बांगलादेश’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.
या आंदोलनासाठी अनेक हिंदू संघटनांनी पाठींबा दिला आहे. तसेच कॅनडातील अनेकं हिंदू संघटना एकत्र आल्या आहेत. तसेच कॅनडातील सरकारने बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील हिंसाचारावर आवाज उठवला आहे.
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील आत्याचारामुळे बांगलादेशी हिंदू भारता येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारताच्य़ा सीमेवर असलेल्या जवानांनी त्यांना भारतात जाण्यापासून मज्जाव केला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी गंभीर परिस्थिती व्यक्त केली आहे.
शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचा हवाला दिला. इच्छा असलेल्यांना भारतात येऊ दिले जात नाही. यावर चर्चा सुरू असून लवकरच मदत केली जाणार असल्याचा तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.