घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चननेच सोडले मौन, म्हणाला, “सॉरी पण...”

    12-Aug-2024
Total Views |
 
abhishek
 
 
 
मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत गेले अनेक महिने चर्चा सुरु होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एकत्रित एन्ट्री न घेतल्यामुळे या चर्चा अधिकच भक्कम होत गेल्या. मात्र, आता स्वत: अभिषेक बच्चन याने या चर्चांवर उत्तर दिले आहे.
 
दरम्यान, एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना मध्यंतरी कोणीतरी या बातमीला दुजोरा देण्यासाठी AI वापरून बनावट व्हिडिओ बनवला आणि हा बनावट व्हिडिओ व्हायरल झाल्याने वातावरण आणखी तापले. आता अभिनेत्याने या सगळ्यावर आपले मौन तोडले असून आपण विवाहित असल्याची पुष्टी केली आहे.
 
बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने त्याच्या लग्नाची अंगठी दाखवून घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आणि 'अजूनही आपण विवाहितच असल्याचे दाखवून दिले.'उगीच गोष्टी वाढवून सांगितल्या गेल्या हे दुर्दैव असल्याचे म्हटले आहे.
 
अभिषेक पुढे म्हणाला की, ' त्याबाबतीत तुमच्याशी बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तुम्ही सर्वांनी या गोष्टी वाढवून चढवून समोर आणल्या आहेत. हे खरंच दुर्दैव आहे. तुम्ही हे असं का करता ते मी समजू शकतो. तुम्हाला काही स्टोरीज् बनवायच्या असतात. ठिक आहे. आम्ही सेलिब्रेटी आहोत. आम्हालाही या गोष्टी स्विकाराव्या लागतील, पण व्हायरल झालेला व्हिडिओ बनावटच होता”, असे त्याने ठामपणे सांगितल्यामुळे अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना अखेर पुर्णविराम लागला आहे.