नवी दिल्ली, दि. १० : विशेष प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत कोट्यवधी रुपयांचा रँड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत घेतली. याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
सत्ता गेल्याने कट कमिशनचे कंटेनर उद्धव ठाकरेंकडे येणे बंद झाले आहे. निवडणूक निधी गोळा करण्यासाठी ठाकरे यांनी गुप्ता बंधूंची भेट घेतल्याचा आरोप खासदार म्हस्के यांनी केला आहे. गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. या प्रकरणातील आरोपी गुप्ता हा दिल्लीत असून उद्धव ठाकरे यांनी त्यांची अर्धा तास भेट घेतली.
गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांची भेट गुप्त ठेवण्यासाठी संजय राऊत यांच्या दिल्लीतील घराभोवतीचे सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते. मात्र या भागातील रस्त्यांवर सीसीटीव्ही असून त्यातून सत्यता कळेल. तपास यंत्रणांनी या वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन तपास करावा, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.