धमक्या, शिविगाळ.... मालवणीत महिला पत्रकाराचा धर्मांधांकडून छळ!

    31-Jul-2024
Total Views |

Amrapali Sharma

मुंबई (प्रतिनिधी) :
मालाड-मालवणी परिसरात राहणारी पत्रकार आम्रपाली शर्मा (Journalist Amrapali Sharma Malwani) यांनी आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून मालाड-मालवणी सारख्या मुस्लिमबहुल भागात राहणे तिच्यासाठी कसे कठीण होत आहे, हे सांगितले आहे. प्राण्यांना खायला दिल्यावर त्यांना शिवीगाळ होते, धमक्या दिल्या जातात, घराबाहेर मांस आणि कचरा फेकला जातो, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाते; जेणेकरून त्या घर आणि परिसर सोडून जातील.

हे वाचलंत का? : सामूहिक बलात्कार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा सहभाग?

आम्रपाली शर्माने काही व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात गैरहिंदुंविरोधात आवाज उठवल्यावर कशाप्रकारे धमक्या दिल्या जातात हे त्यात दाखवले आहे. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये आम्रपाली यांच्या घराच्या दारात मांस आणि कचरा विखुरल्याचे दिसते आहे. मुस्लिम भागात कधीही घर खरेदी करू नका, असे मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केले आहे.