मुंबई : गेल्या काही काळात जितकी हिंदी सेलिब्रिटींची चर्चा होत नाही त्याहून जास्त चर्चेत ओरहान अवत्रामणी म्हणजे ऑरी असतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो असल्यामुळे तो सगळ्यांनाच कसा ओळखतो अशी चर्चा कायम चंदेरी दुनियेतील वर्तुळात रंगलेली असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमातील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय होती. मात्र, आता ऑरीला जरा नेटकऱ्यांच्या रागीट सुराचा सामना करावा लागणार आहे. कारण, ऑरीने नवीन हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत त्यातील कॅप्शनमध्ये ९-५ काम करणाऱ्या चाकरमान्यांची खुल्ली उडवली आहे.
ऑरीने त्याचा नवीन लूक दाखवणारे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी रोज संध्याकाळी चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन उठतो. यात मला काहीच वावगं वाटत नाही. तुम्ही कदाचित अजूनही ९-५ मध्ये काम करत आहात. मला तर वाटते यावेळेत काम करणं किती वाईट आहे. दरम्यान, त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही युजर्सनी त्याच्या नवीन हेअरस्टाइलची खिल्ली उडवली. बऱ्याच जणांनी त्याची तुलना कोंबड्यांशी केली आहे. तसेच त्याच्या फॅशन सेन्सवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने ९-५ जॉब करणाऱ्यांबद्दल जे काही म्हटले त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, '९ ते ५ करणाऱ्यांचा तू अपमान केला आहे. तुझ्या जन्मावेळी मदत करणाऱ्या परिचारिकाही या वेळेतच काम करतात. एकाने एक चिकन इमोजी टाकला आणि लिहिले की त्याला इन्स्टाग्रामवर या लूकबद्दल हीच कमेंट योग्य आहे. एकाने लिहिले, 'ऑरी मला तुझ्यासारख्या लोकांची काळजी वाटते.' एकाने लिहिले'काय गरज होती?' तर चक्क एकाने लिहिले आहे की, 'KFC चा नवीन लोगो.' आता नेमकी हा मुद्दा किती गाजणार आणि याला कोणतं वेगळं वळण लागणार का हे येणारा काळच ठरवेल.