सत्तेत असूनही विरोधकांवर आरोप; महापौरांचे देखील घटनेकडे साफ दुर्लक्ष!

    28-Jul-2024
Total Views |
delhi-ias-coaching-student-death



नवी दिल्ली :       दिल्लीतील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. दिल्लीत घडलेल्या प्रकरणात भाजप आणि आप याच्यांत चांगलीच जुंपल्याचे दिसून येत असून राजेंद्र नगर येथील राव आयएएस ॲकॅडमीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी या प्रकरणी भाजपला जबाबदार धरले आहे.

आ. पाठक म्हणाले, सध्या घटनास्थळावरील पाणी निघून गेले आहे, केवळ दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्येच नाही तर अनेक ठिकाणी कोचिंग इन्स्टिट्यूट तळघराचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत आहे. याच ठिकाणी आता पाणी साचल्याचे सांगितले जात असून रस्त्यावरून पाणी येत होते. याच ठिकाणी पाणी शिरून साचलेल्या पाण्यात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यातच आता आम आदमी पार्टीचे सरकार असताना पक्षाचे आमदार भाजपवर आरोप करत असल्याचे समोर आले आहे.

आ. दुर्गेश पाठक यांनी खोडा घातला असतानाच स्थानिक भागातल्या दिल्लीच्या महापौर शेली यांनी लक्ष दिले नाही. या प्रकरणी दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले की, ही हत्या असून अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. स्थानिक लोकांनी आपचे आमदार दुर्गेश पाठक यांना नाला साफ करण्याची अनेकवेळा विनंती केली होती. पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. तर दुसरीकडे, भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी या मृत्यूला केजरीवाल यांचे सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.