मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

    27-Jul-2024
Total Views |

central Railway
 
मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी, तसेच देखभाल-दुरूस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवार, दि. 27 जुलै रोजी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवार, दि. 28 जुलै रोजी दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
 
तसेच हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येईल. तर, ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी लोकल चालवण्यात येतील.
 
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, ब्लॉककालावधीत बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार, वसई रोड ते बोरिवली, गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. तर, रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल.