'या' चार दिग्गज कलाकारांसोबत पहिल्यांदाच झळकणार रणवीर सिंग

    27-Jul-2024
Total Views |

ranveer singh 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील पावरहाऊस अभिनेता रणवीर सिंग याने आत्तापर्यंत 'गली बॉय', 'बाजीराव मस्तानी', 'दिल धडकने दो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकताच त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर आता तो हिंदीतील दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे.
 
रणवीरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल या दिग्गज कलाकारांचा समावेश असून नक्कीच काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. या नवीन चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओ आणि बी ६२ स्टुडिओज करणार असून नॅशनल अवॉर्ड विजेता आदित्य धर याचे दिग्दर्शन करणार आहे.
 

ranveer singh 
 
रणवीरने फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'ही पोस्ट माझ्या चाहत्यांसाठी आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझं तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की, कधीही न अनुभवलेला अनुभव या चित्रपटाद्वारे तुम्हाला येईल. तुमचा आशीर्वाद कायम असु दे.'