मुंबई : सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रींना सतत त्यांच्या शरारीवर शस्त्रक्रिया करत राहावी लागते किंवा मग सौदर्य प्रसाधनांचा सातत्याने वापर करावा लागतो. मात्र, त्याचा चुकीचा परिणाम होऊन शरीराला हानी देखील होऊ शकते. अशीच काहीशी गंभीर घटना अभिनेत्री जॅस्मिन भसीन सोबत घडली आहे. डोळ्यांना लेन्स लावल्यामुळे गेभीर दु:खापत झाली असून तिला अचानक दिसणं देखील बंद झाल्याचं तिने स्वत: सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जॅस्मिन १७ जुलैला एका कार्यक्रमासाठी दिल्लीत गेली होती. त्यावेळी तयार होत असताना तिने लेन्स लावले; आणि ते लेन्स लावताक्षणी तिच्या डोळ्यांची आग होऊ लागली. तातजीने तिने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं होतं पण कामामुळे तिला त्यावेळी डॉक्टरांकडे जाता आले नाही.
जॅस्मिनने स्वत: प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “जेव्हा मी ते लेन्स घातले तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली. ते दुखू लागले आणि काही वेळाने मला दिसणंच बंद झालं. मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मी डॉक्टरांकडे जायचं ठरवल. त्यानुसार नंतर डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी मलाडोळ्यांचा कॉर्निया खराब झाल्याचे सांगितले. मग डोळ्यांवर पट्टी लावली आणि मी पुढील उपचारांसाठी मुंबईत परतले”. दरम्यान, सध्या तिच्या डोळ्यांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच दिवसांत तिला बरं वाटेल.