देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको!

प्रदेश भाजपची सूचना; सेवाकार्यात अधिकाधिक योगदान द्या

    20-Jul-2024
Total Views |
Devendra fadanvis
 
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दि. २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रे, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.
 
होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी केले आहे.