मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बॅड न्यूज’ चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही पहिल्याच दिवशी उत्तम कमाई केली आहे.
सॅकल्निकने दिलेल्या माहितीनुसार, ‘बॅड न्यूज’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच १९ जुलैला ८.३ कोटींची कमाई केली आहे. तर, प्रेक्षकांकडून चित्रपटाचे कौतुकही केले जात आहे. विकी कौशल, तृप्ती डिमरी, ॲमी वर्क, शिबा चढ्ढासह अनेक कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे.