अखेर 'द बकिंगहॅम मर्डर्स' ची रिलीज डेट जाहिर; करिना गाजवणार बिग स्क्रिन

    02-Jul-2024
Total Views |

The Buckingham Murders 
 
 
 
मुंबई : अभिनेत्री करिना कपूर सध्या मोठा पडदा आणि ओटीटी या दोन्ही माध्यमांत सक्रिय आहे. काही दिवसांपुर्वी जाने जा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यानंतर आता लवकरच अभिनेत्रीचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख लॉक झाली असून हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाचे पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं आहे.
 
'द बकिंगहॅम मर्डर्स' (The Buckingham Murders) चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. कायमच आपल्या वैविध्यपूर्ण कथेसाठी आणि प्रयोगशील कृतीसाठी दिग्दर्शक हंसल मेहता हे चर्चेत असतात. यात करीना कपूर एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारत असून तिचे नाव जस भामरा आहे. आणि हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर चित्रपट आहे. 'द बकिंगहॅम मर्डर्स' या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. मामी चित्रपट महोत्सव २०२३ च्या ओपनिंगचा मान या चित्रपटाने मिळवला होता. तसेच, करिना ‘सिंघम अगेन’ या रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटातही झळकणार आहे.