मायक्रोसॉफ्ट आऊटेजचा सरकारी यंत्रणेला मोठा फटका, केंद्रीय मंत्री म्हणाले....!

    19-Jul-2024
Total Views |
microsoft outage indian govt


नवी दिल्ली : 
    मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. या तांत्रिक बिघाडाचा देशातील सरकारी यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. सर्व बँका, व्यवसायांचे कामकाज ठप्प झाले असून आता केंद्रीय मंत्र्यांनी मोठे भाष्य केले आहे. सरकार अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

दरम्यान, जगभरातील मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे फ्लाइट ऑपरेशन्स आणि स्टॉक मार्केटपासून मीडिया आउटलेट्स आणि बँकिंग ऑपरेशन्सपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-In) ने वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट विंडोज आउटेज बद्दल सल्लागार जारी केला ज्यामुळे जागतिक स्तरावर सेवांवर परिणाम झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत सर्वोच्च सायबर सुरक्षा एजन्सीने कार्यवाही सूरू केली आहे.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मंत्रालयांतर्गत मायक्रोसॉफ्ट आणि त्याच्या सहयोगींच्या जागतिक आउटेजच्या संपर्कात आहे. या आउटेजचे कारण समजले असून समस्येचे निराकरण करण्यासाठी माहिती जारी केली गेली आहेत. सीईआरटी तांत्रिक सल्ला जारी करत असून नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) नेटवर्कवर परिणाम झालेला नाही, असेही केंद्रीय मंत्र्यांनी पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.