महागाई संदर्भात आरबीआय गव्हर्नर दास यांचे महत्त्वपूर्ण विधान!
19-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशात क्रेडिट वाढीच्या तुलनेत ठेवी(डिपॉझिट) जमा करणे, ही गंभीर समस्या आहे, असे विधान भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. तसेच, अर्थव्यवस्थेबाबत स्थिर वाढीदरम्यान महागाईवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही निरीक्षण गव्हर्नर दास यांनी नोंदविले आहे.
आरबीआयने महागाईवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून विशेषत: निरंतर आर्थिक वाढीदरम्यान महागाई वाढीवर लक्ष ठेवले पाहिजे, असे दास यांनी फायनान्शियल एक्सप्रेस मॉडर्न बीएफएसआय समिटमध्ये बोलताना सांगितले. आता भारतीय अर्थव्यवस्था वाढीदरम्यान सरकारच्या अनुकूल धोरणाचा एक भाग आहे.
आरबीआय नेहमीच महागाई वाढीच्या आकड्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करते. गव्हर्नर दास पुढे म्हणाले, आरबीआयने जारी केलेल्या नियमनानुसार महागाईवाढ लक्षात घेऊन किंमत स्थिरता (४ टक्के राखून महागाई राखणे) मध्यवर्ती बँकेला अनिवार्य केले आहे. त्यामुळे सर्व आर्थिक धोरण निर्णयांमध्ये वाढीचा पैलू नेहमी लक्षात ठेवला जातो, असे शक्तिकांत दास म्हणाले.