अजित पवारांच्या पक्षात मोठे बदल! राष्ट्रीय प्रवक्तेपदी केली 'यांची' नियूक्ती
19-Jul-2024
Total Views |
मुंबई : लोकसभा आणि विधापरिषद निवडणूका पार पडल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीलाही लागले आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षात मोठे बदल केले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्तेपदी विधानपरिषदचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षातील युवा चेहरे वेगवेगळ्या व्यासपीठांवर पक्षाचा आवाज ठामपणे मांडतील यात शंका नाही, असा विश्वासही अजितदादांनी व्यक्त केला आहे.