SNDT महिला विद्यापीठात यशस्वी विज्ञान प्रदर्शन!

    18-Jul-2024
Total Views |
 
SNDT
 
मुंबई : SNDT महिला विद्यापीठातील पी.वी.डी.टी. महिला शिक्षण महाविद्यालयाच्या विज्ञान क्लबतर्फे १२ जुलै २०२४ रोजी यशस्वी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एसएनडीटी विद्यापीठाचे डीन प्रा. डॉ. हिम्मत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या विज्ञानप्रदर्शनीचे उद्धाटन पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यवाहू प्राचार्य डॉ. संजय शेडमाके होते.
 
विज्ञान क्लबच्या अध्यक्षांनी आणि विज्ञान शिक्षिकांच्या टीमने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले असून या शिक्षिकांनी स्वतः तयार केलेल्या विविध शास्त्रीय संकल्पना दर्शवणारे आकर्षक मॉडेल्स सादर केले. या प्रदर्शनांमध्ये खालील विषयांचा समावेश होता - 
अदीबा - हरितगृह परिणाम
ताजीन - सूक्ष्मदर्शीय यंत्र
कृती - मूत्रपिंडाचे कार्य
फाबिहा - मानवी हाडांची रचना
हारिम - गतीचे प्रकार
इराम - गुरुत्वीय बल
सुनीता - वनस्पती पेशी
मिनाक्षी - टिपण सिंचन
मिनल - जलविद्युत
स्वाती - व्हॅक्यूम क्लिनर
शिल्पा - मानवी मेंदू
पल्लवी - सौर ऊर्जा
ज्योत्स्ना - सूर्यग्रहण
हिंदवी - थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर
सबा - भूकंप अलार्म डिटेक्टर
 
विज्ञान प्रदर्शनीतील प्रत्येक मॉडेल हे विद्यार्थिनींनी बारकाईने तयार केलेले असून त्यांनी त्यांचे सखोल ज्ञान आणि समर्पण प्रभावीपणे सादर केले आहे. प्रा. डॉ. हिम्मत जाधव यांनी प्रत्येक मॉडेलची माहिती घेत सादरीकरण पाहिले आणि विद्यार्थिनींच्या योगदानाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताजीन हिने केले तर डॉ. सिद्धार्थ घाटविसाव यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रदर्शनाने विद्यार्थिनींना त्यांचे वैज्ञानिक कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान केले आणि त्यांच्यातील नावीन्यपूर्ण वृत्ती रुजवली.