मुंबई : सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल सध्या कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय बनली आहे. एमटीएनएल कंपनीत टाटा उद्योगसमूह मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. एमटीएनएल आणि टाटा यांच्यात मोठ्या वाटाघाटी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एमटीएनएल कंपनी सध्या तोट्यात असून त्या कंपनीला यातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून या कंपनीस निकाली काढण्यात येत आहे.
दरम्यान, आता केंद्र सरकारकडून एमटीएनएल बॉण्ड्सच्या थकबाकीसाठी ९२ कोटी रुपये भरण्यासाठी पाऊल उचलण्यात येत आहे. सरकारी स्त्रोतांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये देय असलेल्या व्याजाकरिता आणखी ६४ कोटी रुपये येत्या काही दिवसांत दिले जातील. तसेच, दूरसंचार कंपनीवरील आर्थिक संकट टाळण्याकरिता सरकारी मदतीचा हात अत्यावश्यक असतो. त्यामुळे कंपनी कर्जाच्या जबाबदाऱ्यांबाबत विशेषतः या प्रकरणात सरकारी-गॅरंटीड बॉण्ड्सच्या संदर्भात अडचणीत आले आहे.
विशेष म्हणजे वाढत्या आर्थिक संकटांदरम्यान एमटीएनएल(MTNL) ने गेल्या आठवड्यात लीगल फाइलिंगमध्ये सांगितले की, अपुऱ्या निधीमुळे विशिष्ट बाँडधारकांना व्याज देय देऊ शकत नाही. देय तारखेच्या १० दिवस आधी पुरेशा रकमेसह अर्ध-वार्षिक व्याज खात्यात जमा केले पाहिजे, असेही कंपनीने म्हटले आहे.