जगन्नाथ पुरी मंदिरातील 'रत्न भंडाराचे' ऑडिट होणार; RBI च्या अधिकाऱ्यांसोबत सर्पमित्रांचीही पथकात समावेश

    14-Jul-2024
Total Views |
 Jagannath Puri
 
भुवनेश्वर : ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात पहिल्यांदाच 'रत्न भंडार' उघडला जात आहे. हे रत्न भंडार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४६ वर्षांपूर्वी उघडण्यात आले होते. या भंडाराच्या आत काय आहे हे कोणालाही माहिती नाही. हे १९८५ मध्ये उघडण्यात आले. मग त्यातल्या सगळ्या गोष्टींची यादी बनवली. मात्र, तेव्हा या तपास पथकाला ‘आतल्या दालनात’ प्रवेश करता आला नव्हता. तेव्हा अनेक साप त्याचे रक्षण करतात असा समज होता.
 
तेव्हापासून आजतागायत त्यात किती धन आहे आणि त्याची किंमत काय आहे, याबाबत काहीही समजू शकलेले नाही. या कामासाठी ‘श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन’ (एसजीटीए) च्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली एक पथक तैनात करण्यात आले आहे. त्यात ‘भारतीय पुरातत्व विभागाचे (ASI)’ लोकही असतील. एएसआय या मंदिराची देखभाल करते. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी त्यात आरबीआयच्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) प्रतिनिधीचाही समावेश करण्यात आला आहे. ही प्रक्रिया १९७८ मध्ये ७० दिवसांत पूर्ण झाली होती. यावेळी चावी न मिळाल्यास दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कुलूप तोडण्यात येईल.
 
या पथकासोबत सर्पमित्रही जाणार आहे. वैद्यकीय साहित्याची गरज भासल्यास त्यासाठी डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. २०१८ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याच्या संरचनेची चाचणी करण्यात आली होती. तथापि, काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की 'रत्न भांडार'च्या आत सापांची चर्चा देखील एक दंतकथा असू शकते. पण, इथे काही छोटे साप असण्याची शक्यता ते नाकारत नाहीत.