मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने १२ जुलै २०२४ रोजी राधिका मर्चंट सोबत सात फेरे घेत साता जन्माची लग्नगाठ बांधली. अंबानी कुटुंबियांच्या या आनंदात सामील होण्यासाठी कलाकार, राजकीय नेते आणि परदेशी पाहूण्यांनी हजेरी लावली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अंबानी कुटुंबीयांची भेट घेऊन नवीन जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता व लेक दिविजा हे तिघंही या लग्नकार्याला उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा हे दोघं देखील या लग्नकार्यात सहभागी झाले होते.
याशिवाय, पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, स्मृती इराणी, अभिषेक मनु सिंघवी, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, असे राजकीय क्षेत्रातील बरेच मान्यवर या लग्नसोहळ्याला अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
मुकेश अंबानी यांनी देशासह विदेशातील अनेक मान्यवरांना या लग्नसोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे परदेशातील अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.