मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    13-Jul-2024
Total Views | 49
Sisters Scims
 
नवी मुंबई : माजी विरोध पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गर्शनाखाली प्रभाग क्रमांक ६५, ७७ व ७८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेच्या मदत केंद्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्र. ६५, ७७ व ७८ अंतर्गत असलेल्या वाशीगाव, सानपाडा- पामबीच आणि जुईनगर येथील महिलां - भगिनींना नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेचा व मतदार सर्व्हे मदत केंद्र असे तिन्ही प्रभागांसाठी सुरु करण्यात आले आहेत.
 
तसेच लाडकी बहिण योजना अन्य परिसरातील रहिवासी असलेल्या महिला भगिनींना लाभ मिळवा या उद्देशाने मा आमदार गणेशजी नाईक साहेब यांची प्रेरणा व संदीप नाईक साहेब यांच्या आदेशाने तसेच नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत यांच्या पुढाकाराने या योजनेबाबत मदत केंद्र हे तिन्ही प्रभागातील नगरसेविका जनसंपर्क कार्यालयात.
 
दोन्ही मदत केंद्रांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. रोजी सानपाडा-सोनखार येथील सेक्टर १५ येथील ऍम्फी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या आवारात पार पडला. सदर तिन्ही प्रभाग मदत केंद्राच्या मधून योजने संदर्भातील माहिती तसेच अर्ज वाटप व आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती दशरथ भगत यांनी दिली.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121