मुंबई : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतल्या बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे संपन्न झाला. त्यांच्या लग्नाला संपुर्ण हिंदी चित्रपटसृष्टीने हजरेरी लावली होती. याशिवाय राजकीय नेते, परदेशी पाहुण्यांनी देखील आवर्जून हजेरी लावत नव वधू-वरांना आर्शिवाद दिला.
अनंत – राधिकाच्या वरातीत रजनीकांत, सलमान खान, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, अनिल कपूर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अनन्या पांडे, वीर पहारिया, मानुषी, खुशी कपूर, वरुण धवन, सलमान खान, शाहरुख खान, रितेश-जिनिलीया, माधुरी दीक्षित असे सगळे सेलिब्रिटी जबरदस्त डान्स करताना दिसले. तसेच, लग्न सोहळ्याच्या जागी राधिका मर्चंट हिने सासरेबुवा मुकेश अंबानींचा हात धरून लग्नमंडपात एन्ट्री घेतली. लग्न मंडपात राधिका मर्चंटच्या ग्रँड एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. रथात बसून तिने या सोहळ्यात अगदी स्वप्नवत एन्ट्री घेतली. विवावाहनंतर आज १३ जुलै रोजी काही कार्यक्रम आणि उद्या १४ जुलै रोजी रिसेप्श्न सोहला होणार आहे.