मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानीचा आज १२ जुलै रोजी राधिका मर्चंट सोबत विवाह होणार आहे. त्यांना आर्शिवाद देण्यासाठी देश-विदेशातून पाहुणे मंडळी आली आहेत. तसेच, गेले काही दिवस त्यांचे प्री-वेडिंगचे अनेक कार्यंक्रम झाले. या सर्व सोहळ्यांमध्ये राधिकाचा प्रत्येक लूक लोकांचे लक्ष वेधून घेणारा होता. अशातच राधिका आणि अनंतच्या हळदी समारंभाला फुलांचा ड्रेस घातला होता. नेमकी तोच ड्रेस का अशी चर्चा सुरु असताना त्याचं कनेक्शन सापडलं आहे.
राधिका मर्चंटने हळदी समारंभाला पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याची ओढणी ताज्या फुलांनी सजली होती. मुळात ही अंबानी कुटुंबाची परंपरा आहे.
त्यांची ही प्रथा सांगणारा एक फोटो समोर आला आहे. २०१८ मध्ये श्लोका व ईशा अंबानी यांनी देखील असाच लूक केल्याचं व्हायरल फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. श्लोका व ईशा अंबानी यांनी फुलांनी सजलेला ड्रेस घातल्याचे खास फोटो अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये सोशल मीडियावर शेअर केले होते.