नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ‘नीट’ पदवी परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पुढे ढकलली. यावर पुढील सुनावणी दि.18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ‘नीट’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे अध्ययन काही वकिलांनी अद्याप केले नसल्याचे न्यायालयाने सांगितले.