भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदितीची काका राहूल द्रविडसाठी खास पोस्ट

    01-Jul-2024
Total Views |
 
Aditi Dravid
 
 
 
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक पटकावत सर्व भारतीयांची मने जिंकली. त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे कॅप्टन रोहित शर्मा, रनमशीन विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इतर सर्वच खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये क्रिकेट संघाचे कोच राहुल द्रविड याचंही योगदान अतिशय मोलाचं आहे. राहुल द्रविडची पुतणी मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने काकासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
 

Aditi Dravid 
 
अदितीने तिचे बाबा विनायक द्रविड आणि काका राहुल द्रविड यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. राहुल द्रविडसारखा ग्रेट माणूस हा अदितीचा काका असल्याने तिला कायमच अभिमान आहे. अदितीने लिहिले आहे की, 'धन्यवाद कोच! तू त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलंस. एकदम योग्य शेवट झाला. या फेअरवेलसाठी तू पात्र आहे. तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. THE WALL. माझ्या आयुष्यातील या दोन बेस्ट MEN साठी मी कायम आभारी आहे". राहुल द्रविड हे अदितीचे चुलत काका आहेत. खुद्द अभिनेत्रीनेच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना याचा खुलासा केला होता.