मुंबई : रोटरी क्लब ऑफ डाऊनटाऊन सीलँडच्या माध्यमातून कुलाबा येथील सोमाणी गार्डन येथे दि.१ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. तसेच वृक्षारोपणानंतर वृक्षसंवर्धनावर प्रबोधन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत, डॉ. सरोज वर्मा,अजय कासोटा,डॉ. बिमल मल्होत्रा यांच्यासह वरिष्ठ सदस्य नंदकिशोर बाफना, दर्शन चड्डा, बँकिम खोणा, पिशू मन सुखानी, सुग्रा, तसेच तरुण रोट्रॅक्ट सदस्य यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
यासाठी मुंबई महानगरपालिकेने रोटरी क्लब ऑफ डाऊनटाऊन सीलँडला वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपल्बध करून दिली. या कार्यशाळेत फ्रेंडस ऑफ ट्रीजच्या सकीना गाडीवाला यांनी घरात कुंडीतील वृक्षांची लागवड कशी करावी? तसेच बायोकेमिस्ट डॉ. सुजाता भट्ट यांनी इकेबाना पुष्परचनेसंदर्भात उपस्थित रोटरी क्लबच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान 'निसर्गाकडे चला' या उद्देशाने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्याला फ्रेंडस ऑफ ट्रीजच्या माध्यमातून कुंडीतली रोपे भेट देण्यात आले. तसेच यावेळी डॉ. अरुण सावंत यांनी मुंबई महापालिका आणि उद्यान विभागाचे तसेच पालिकेच्या 'वार्ड ए'च्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.