Kalki 2898 AD ने अवघ्या ४ दिवसांत पार केला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

    01-Jul-2024
Total Views |
 
Kalki 2898 AD
 
 
 
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने एक वेगळेच सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. जगाचा सर्वनाश भविष्यात कसा होणार आहे आणि त्याला कोण वाचवणार आहे या पौराणिक कथांवर आधारित कल्की चित्रपटाचे कथानक बांधण्यात आले आहे. २७ जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत जगभरात ३०० कोटींचा आणि देशात १०० कोटींच्या पल्ला पार केला आहे.
 
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट अवघ्या ४ दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा तेलुगु भाषेतील सहावा आणि प्रभासची प्रमुख भूमिका असणारा बाहूबलीनंतरचा तिसरा चित्रपट आहे ज्याने कमी काळात १०० कोटींचा पल्ला पार केला आहे.
 
पहिल्या दिवशी या चित्रपटाने तेलुगु भाषेत ६५.८ कोटी, तमिळ भाषेत ४.५ कोटी, हिंदी भाषेत २२.५ कोटी, कन्नड भाषेत ०.३ कोटी आणि मल्याळम भाषेत २.२ कोटी कमवत एकूण ९५.३ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेलुगू ३०.५५ कोटी, तमिळ ३.३ कोटी, हिंदी २३ कोटी, कन्नड ०.३५ कोटी, मल्याळम २.१ कोटी कमवत एकूण ५९.३ कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी तेलुगू ३२.३५ कोटी, तमिळ ५ कोटी, हिंदी २६ कोटी, कन्नड ०.४५ कोटी, मल्याळम २.४ कोटी कमवत ६६.२ कोटी कमावले. आणि चौथ्या दिवशी तेलुगू ३८.८ कोटी, तमिळ ५.५ कोटी,हिंदी ४० कोटी, कन्नड ०.७ कोटी, मल्याळम ३.२ कोटी कमवत ८८.२ कोटी कमावले.
 
 
 
‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच, जगभरात या चित्रपटाने आत्तापर्यंत १९१.५ कोटी कमावले आहेत.