मुंबई : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तिने स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. हिनाचा कॅन्सर स्टेज ३ वर असून तिला आधार देणाऱ्या बऱ्याच पोस्ट देखील केल्या होत्या. सध्या हिना उपचार घेत असून ती कशाप्रकारे लढा देत आहे तिच्या या प्रवासावर नुकतंच ती स्टोरी शेअर करत व्यक्त झाली आहे.
काय आहे हिनाची पोस्ट?
हिनाने लिहिलं आहे की, "माझ्या प्रवासाची एक झलक... ही पोस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या सर्व धाडसी महिला आणि पुरुषांसाठी ... माझाही प्रवास इतरांसाठी असाच प्रेरणादायी असो जेणेकरुन ते त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देईल. आणि लक्षात ठेवा आपल्या मनावर आणि शरीरावर जरी आघात झाला असला तरी आपण घाबरायचं नाही. न घाबरायची शपथ घेऊया."