नराधम मिर्झा सरफराजने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; गरोदर राहिल्यामुळे पीडितेचा मृत्यू

    30-Jun-2024
Total Views |
 crime
 
बंगळुरू : कर्नाटकातील कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वारंवार होणाऱ्या बलात्कारामुळे १३ वर्षांची मुलगी गरोदर राहिली. या अल्पवयीन मुलीच्या अंतर्गत दुखापतींमुळे आरोग्याची गुंतागुंत आणि अनेक अवयव निकामी झाले. यानंतर तिचा मृत्यू झाला. ३० वर्षीय मिर्झा सरफराज याने अनेक महिने मुलीवर बलात्कार केला.
  
मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की पाच-सात लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गेल्या ८ महिन्यांत असे अनेकदा घडल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांची मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली. तिच्या आईचा आरोप आहे की, मिर्झा सरफराज आणि त्याचे साथीदार त्यांच्या मुलीवर बलात्कार करायचे.
 
रिपोर्टनुसार, पीडितेला शांत राहण्यासाठी गुन्हेगारांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ती गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी ३० वर्षीय मिर्झा सरफराजला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. सर्फराज हा बालंद परवेझ कॉलनी येथील रहिवासी आहे. पीडितेला पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या गरोदर असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. याबाबत पीडितेला विचारले असता तिने सांगितले की, मिर्झा सरफराजने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
 
मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की मुलीला गुरुवार, दि. २७ जून २०२४ रात्री कलबुर्गी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला अनेक प्रकारच्या जखमा झाल्या होत्या. अंतर्गत जखमाही होत्या. मात्र, शुक्रवार, दि. २८ जून २०२४ दुपारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.