भारतातल्या पहिल्या निवडणूक आयुक्तांवर येणार बायोपिक, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा

    03-Jun-2024
Total Views |

sukumar sen 
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहिर होणार आहे. सध्या सगळ्यांचेच लक्ष निकालाकडे लागले असले आहे. अशात आता भारताचे पहिले निवडणूक आयुक्तांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे. विद्या बालन यांचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
 
सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली असून 'रॉय कपूर फिल्म्स' सुकुमार सेन यांच्यावर बायोपिकची निर्मिती करणार आहेत. 'गेल्या महिन्यात कोणते चिन्ह दाबून तुम्ही कोणाला मतदान केले याने काही फरक पडत नाही. खरं महत्व आहे तुमच्या बोटावरील त्या छोट्या काळ्या शाईला. आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत एक अविश्वसनीय कथा जी तुम्ही चुकवू शकत नाही."
 
 
 
सुकुमार हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांचा जन्म २ जानेवारी १८९९ रोजी बंगाली बैद्य-ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ पर्यंत कार्यकाळ पुर्ण केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने १९५१-५२ आणि १९५७ मध्ये, स्वतंत्र भारताच्या पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणूकांचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले होते. याशिवाय १९५३ साली सुदानमध्ये पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणूनही काम पाहिले होते. स्वतंत्र भारताच्या निवडणूकांचे मास्टरमाईंड म्हणून सुकुमार सेन यांची ओळख आहे.