मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' रंपाट ' वाढ झाली आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच गुंतवणूकदारांची दिवाळी आली आहे का प्रश्न पडणे स्वाभाविक ठरले आहे. सकाळी अकराच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल २११७.४ पातळीवर म्हणजेच २.८८ टक्क्यांनी वाढून ७६०९२.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६२७.१० अंशाने (२.७८%) वाढत २३१५७.८० पातळीवर पोहोचला आहे.
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांक १९८२.४९ अंशाने वाढत निर्देशांक ५७७५४.२१ पातळीवर (३.५५%) व निफ्टी बँक निर्देशांक १५६३.४५ अंशाने ५५४७.४० (३.१९%) पातळीवर पोहोचला आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ निफ्टी बँक (३.३६%), फायनांशियल सर्विसेस (३.४६%), एफएमसीजी (०.९४%) मिडिया (३.०४%), मेटल (३.००%), पीएसयु बँक (६.२८%), प्रायव्हेट बँक (२.८८%), तेल गॅस (५.४७%) समभागात झाली आहे तर कुठल्याही समभागात घसरण झालेली नाही. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ३.०८ व १.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे २.६४ व २.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बाजारातील एकूणच समभागात मोठी वाढ झालेली पहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांसाठी आज एकदम तेजीत व्यवहाराची पातळी निर्माण झाली आहे. निवडणूकीचा निकाल उद्या चार जूनला असल्या कारणाने बाजारातील रॅली झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारातील चढउतार होत असताना अंडरकरंट कायम होता जो आज मोठ्या प्रमाणात बाहेर आला आहे.
अमेरिकन बाजारातील महागाई दरा सोबतच जीडीपी व पीसीईचे आकडे आज अपेक्षित असताना त्याकडे मात्र गुंतवणूकदारांनी पाठ फिरवत भारतीय बाजारातील चढ्या दराने पुढे चाललेली भारतीय अर्थव्यवस्था व नुकतेच आलेले जीडीपीचे दर, भारतातील निवडणूक या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात निर्देशांकात वाढ झाली आहे. वीआयएक्स निर्देशांकात २२ टक्क्यांची पातळी गाठली असल्याने त्याचा फायदा बाजारात झाला आहे.
बाजारातील वीआयएक्स निर्देशांकात झालेल्या मोठ्या बदलांवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीज हेड ऑफ डेरिएटिव रिसर्च सहज अग्रवाल म्हणाले, ' या आठवड्यात आम्ही अस्थिरता कमी होण्याची अपेक्षा करतो, तांत्रिकदृष्ट्या अस्थिरता क्रश म्हणून संदर्भित आहे. सामान्यतः, बाजारावर परिणाम करणारी घटना पर्यायांच्या गर्भित अस्थिरता (IV) मध्ये तर्कहीन वाढ करते. हे प्रामुख्याने इव्हेंटच्या निकालाभोवती असलेल्या भीती आणि अनिश्चिततेमुळे होते.उच्च निहित अस्थिरता पर्याय विक्रेत्यांसाठी आकर्षक आहेत आणि पर्याय खरेदीदारांना गती देतात. कमी IV (Implied Volatility)शासनाकडे परत जाणे अनेकदा कठोर असते, ज्यामुळे जोखीम व्यवस्थापन महत्त्वपूर्ण होते. जसजशी घटना पुढे सरकते आणि निश्चितता येते, तसतसे IV कोसळतात आणि सामान्य पातळीवर परत येतात.गोष्टींच्या दृष्टीकोनातून, भारत VIX ने १० चा निचांक बनवला आणि सध्या २६ वर शिखर गाठून २४ अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. भारत VIX साठी मागील १५ महिन्यांची सरासरी १३-१५ वर पाळली गेली आहे. म्हणून, डेल्टा म्हणून संदर्भित अंतर्निहित हालचालीच्या प्रभावासह, IV क्रॅश आणि पर्याय प्रीमियम्समध्ये अचानक घट होण्याची अपेक्षा करा.'
बीएसईतील आज पॉवर ग्रीड, एनटीपीसी, एसबीआय, लार्सन, एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, बजाज फायनान्स, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक ,टाटा स्टील, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, विप्रो, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टीसीएस, आयटीसी, नेस्ले, टायटन कंपनी, एचसीएलटेक, सनफार्मा, एशियन पेंटस या समभागात वाढ झाली आहे तर गोडफ्रे फिलीप, बिकाजी फूड, ग्लोबल हेल्थ, फोर्टिस हेल्थ, सुवनफार्मा, सोनाटा, राजेश एक्सपोर्ट, झायडस वेलनेस, अजांटा फार्मा, ओरिएंट इलेक्ट्रिक, आयशर मोटर्स, क्रिसील, ईआयएच, स्टार हेल्थ, जिलेट इंडिया, पीसीबीएल, डीसीएम श्रीराम, हावेल्स इंडिया या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत उजस एनर्जी, सनवारिया एनर्जी, अदानी पॉवर,नझारा, टेक्नो इलेक्ट्रिक, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर,पॉवर फायनान्स, पीटीसी इंडस्ट्रीज, आरईसी, स्वस्तिक पाईप, बाहेती, बँक ऑफ बडोदा, अदानी टोटल गॅस,अदानी एनर्जी, अदानी एनर्जी, श्रीराम फायनान्स या समभागात वाढ झाली आहे तर आयशर मोटर्स, एचडीएफसी लाईफ, सनफार्मा, ब्रिटानिया, एशियन पेंटस या समभागात घसरण झाली आहे.