मुंबई : अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे शूटर्स लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचेही समोर आले आहे. तसेच, नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी अजय कश्यप आणि त्याच्या साथीदाराचे व्हिडीओ कॉलवर जे बोलणं झाले, त्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. यातून असं समोर आलं आहे की तबब्ल ७० जणं सलमानचा जीव घेण्यासाठी सर्वत्र पसरले आहेत.
मुंबई पोलिसांच्या हाती या गोळीबार प्रकरणाबाबत महत्वाचा पुरावा लागला असून पोलिसांनी पकडलेल्या आरोपींपैकी अजय कश्यप आणि त्याच्या साथीदाराचे व्हिडीओ कॉलवर जे बोलणं झाले, त्याचा व्हिडीओ मिळाला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या कटानुसार, ७० ते ८० जणं सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी करत होते. आणि हे सगळेच आरोपी सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याच्या तयारीतही होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. यापैकी एकाने तुरुंगातच आत्महत्या केली होती. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले असून या प्रकरणाला पोलिस अधिक तपास करत आहेत.