रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना म्हणाली, "ही धोक्याची घंटा आहे..."

    03-Jun-2024
Total Views |

kangana  
 
 
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिच्यावर मद्यधुंद अवस्थेत काही महिलांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे ती वादात अडकली होती. परंतु, घडलेल्या प्रकारीची सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून रवीनावर केलेल्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणावर कंगना रणावत हिने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत, "रवीनासोबत जे झालं ती धोक्याची घंटा आहे”, असे सूचक शब्द तिने लिहिले आहेत.
 
कंगनाने रवीनाच्या समर्थनात पोस्ट करत लिहिले आहे की, "रवीनासोबत जे झालं ती धोक्याची घंटा आहे. तिच्या विरोधात जर आणखी ५-६ लोकं असते तर तिला त्यांनी ठारच मारलं असतं. रस्त्यावरील अशा प्रकारच्या उद्रेकाचा निषेध केला पाहिजे. अशा लोकांना फटकारलं पाहिजे. अशा प्रकारे विचित्र आणि हिंसक वर्तन करणाऱ्यांना अजिबातच सोडलं नाही पाहिजे."
 

kangana  
 
तसेच, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी देखील रवीनाला क्लिनचिट दिली असून तिने मद्य प्राशन केले नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवीनाच्या कारने कोणालाही धडक दिलेली नव्हती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती रवीनावर त्याच्या आईला धडक दिल्याचा आरोप करताना दिसत असून रवीनाने त्याला धमकावल्याचाही त्याने दावा केला. रवीनाच्या घराजवळून तो त्याची आई, बहीण आणि भाचीसोबत जात असताना हा प्रकार घडला असं तो म्हणताना दिसत आहे. मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर लक्षात आलं की महिलेला धडक बसलीच नव्हती. रवीना कारबाहेर आली असता तिला उलट जमावाने धक्का दिला. ती सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना बांद्रा येथील कार्टर रोड परिसरात घडली. या प्रकरणी कोणताही एफ.आय.आर रजिस्टर झालेला नाही. रवीना नशेत नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.