IPO Update: Kronox कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल

१२९ ते १३६ रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित

    03-Jun-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: आजपासून क्रोनोक्स (KRONOX )कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहे. क्रोनोक्स कंपनीने शेअर ऑफर फॉर सेलसाठी (OFS) ०.९६ लाख शेअर्स बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत.हा आयपीओ ३ जून ते ५ जूनपर्यंत बाजारात गुंतवणूकीसाठी दाखल करण्यात आला आहे कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी ६ जून २०२४ पर्यंत बाजारातील आयपीओ वाटप निश्चित करणार आहे. कंपनीचा आयपीओ दोन्ही बीएसई व एनएसईत नोंदणीकृत (Listing) होणार आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने प्राईज बँड १२९ ते १३६ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे. तर गुंतवणूकदारांना कमीतकमी १४९६० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ११० समभागांचा एक गठ्ठा (Lot) असणार आहे. असे १४ गठ्ठे गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, अपात्र झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ७ जून पासून मिळू शकतो. तर १० तारखेला कंपनी सूचीबद्ध होणार आहे.
 
कंपनी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना २८.५७ टक्के समभाग वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) २१.४३ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Inve stors)गुंतवणूकीसाठी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. जोगिंदर सिंह जसवाल, केतन रमानी, प्रितेश रमानी हे कंपनीने प्रमोटर (संस्थापक) आहेत.
 
२००८ साली या कंपनीची स्थापना झाली होती. Kronox Lab Sciences Limited कंपनी फार्मास्युटिकल व बायोटेक व तत्सम उत्पादने बनवतात. आर्थिक वर्ष ३१ डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२३ मधील ९७.५ कोटींच्या तुलनेत घट होत ६८.४४ कोटी महसूल मिळाला होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात ( Profit After Tax) मध्ये देखील घट होत ३१ मार्च २०२३ मधील १६.६२ कोटींच्या तुलनेत १५.४७ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५०४.६१ कोटी होते.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर ब्रँडिग, तरलता येण्यासाठी व कंपनी लिस्टिंग करण्यासाठी केला जाणार आहे.