अवैध बार - पबवर बुलडोझर कारवाई सुरूच!

    29-Jun-2024
Total Views |
thane city illeagal pub bar action


ठाणे :     
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सतत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत आदेश दिले. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात बुलडोझर कारवाई सुरू होती.

दरम्यान, या कारवाईत एकूण १९ पानटपऱ्या सिल करण्यात आल्या. तर हॉटेल, पब, बार हुक्का पार्लर असे मिळून ११ ठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली. सुमारे ९२ हजार चुरस फूट क्षेत्रावर कारवाई केली. तरुण पिढी अमली पदार्थाच्या संकटात अडकू नये यासाठी मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आणि पोलीस विभाग संयुक्तपणे निष्कासन कारवाई करीत आहेत.




पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार हुक्का पार्लर, बार यावर कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेच्या कागदपत्रांची तपासणी करून अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई सुरू केली. गुरूवारी एकूण ३१ पानटपऱ्या जप्त करुन हॉटेल, पब, बार असे मिळून ०८ ठिकाणी तर ०९ शेडवर कारवाई करण्यात आली होती.

तर, शुक्रवारी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले अशी ०८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ४० पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तर, ०९ बार, पब, हुक्का पार्लर काढण्यात आले होते. शनिवारी त्यात, वर्तकनगर, घोडबंदर रोड, नागला बंदर भागातील १९ पान टपऱ्या आणि ११ हुक्का पार्लर, पब, बार यांची भर पडली.