अनधिकृत मशीद पाडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला; जमावाने बुलडोझरही तोडला!

    29-Jun-2024
Total Views | 293
team-attacked-in-kathua-that-reached
 

नवी दिल्ली :      जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कठुआ जिल्ह्यात अवैध मशीद पाडण्यासाठी येथे पोहोचलेल्या प्रशासकीय पथकावर जमावाने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात डीएसपीसह सहा अधिकारी जखमी झाले असून पाडकामासाठी आणलेला बुलडोझरही जमावाने फोडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे.


स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हे प्रकरण कठुआ जिल्ह्यातील नागरी तहसीलमधील कल्याणपूर पडरी भागातील आहे. दि. २९ जून २०२४ रोजी घडलेल्या प्रकारानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला असून बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद पाडण्यासाठी सरकारी अधिकारी जेसीबी मशिन घेऊन येथे आले होते. मशिदीवर बुलडोझर टाकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गुजर बकरवाल समाजाचे लोक तेथे मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर जमावाने तेथे दगडफेक सुरू केल्याचे वृत्त आहे.
 
जमावाने केलेल्या हल्ल्यात डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यासह ६ पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने मशीद पाडण्यासाठी आणलेला जेसीबीही फोडला. दरम्यान, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्याचा उद्देश परिस्थिती आणखी बिघडू नये व सर्व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, घटना गांभीर्याने घेत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत येत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121