अयोध्येतील खराब रस्त्याप्रकरणी सहा अभियंत्यांची हकालपट्टी; सरकारकडून कारवाईचा बडगा!

    29-Jun-2024
Total Views |
ayodhya-ram-path-collapse-case-up-government


लखनऊ :        मान्सूनपूर्व पावसात अयोध्येतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. रामपथ येथील रस्ते पाण्याखाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून ६ अभियंत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून या प्रकरणी कारवाई केली जात आहे.

दरम्यान, सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जल निगमच्या सहा अभियंता- अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खराब रस्त्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जल विभागावर ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात पीडब्ल्यूडीसह जल विभागातील अभियंता-अधिकारींना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. तपास अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होऊ शकते, अशी माहिती समजते आहे.

स्थानिक वृत्तानुसार, यूपी सरकारने तीन पीडब्ल्यूडी अभियंता, कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल, सहायक अभियंता अनुज देशवाल आणि कनिष्ठ अभियंता प्रभात पांडे यांना निलंबित केले आहे, तसेच, जल निगमचे कार्यकारी अभियंता आनंद कुमार दुबे, सहायक अभियंता राजेंद्र कुमार यादव आणि कनिष्ठ अभियंता मोहम्मद शाहिद यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

अयोध्येतील खराब रस्त्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होऊ शकते. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असणे हे या कोसळण्याचे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने या घटनेला दिलेल्या तत्पर प्रतिसादात केवळ अभियंत्यांना निलंबित केलेच नाही तर नागरी कामात गुंतलेल्या गुजरातस्थित कंपनीच्या जबाबदाऱ्यांची सखोल चौकशी सुरू करण्यास सुरूवात केली आहे. फर्मला बांधकाम दर्जाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121