मुंबई : नवरा-बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ. ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते. पण, हल्ली ही गाठ किती काळ टिकेल, हे मात्र सांगणं कठीण. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवर्याला चक्क पाच जन्मांआधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण, या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे येत्या 12 जुलैला आपल्याला ’बाई गं’ या चित्रपटातून समजणार आहे.
‘बाई गं’ या चित्रपटाचा भन्नाट ‘टीझर’ प्रदर्शित झाला आहे. या ‘टिझर’मध्ये स्वप्नील जोशीला किती कसरत करावी लागते, हे दिसतंय. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडेसुद्धा आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन, एबीसी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ’बाई गं’ हा धम्माल चित्रपट 12 जुलैला प्रदर्शित होत आहे.