हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका; मनी लाँड्रिंग प्रकरणात हायकोर्टाने दिला जामीन

    28-Jun-2024
Total Views | 37
 hemant soren
 
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने शुक्रवार, दि. २८ जून २०२४ सोरेन यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन संध्याकाळी रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले. न्यायालयाने दि. १३ जून रोजी सोरेन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
 
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे कार्याध्यक्ष सोरेन यांना दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात अटक केली होती. सोरेन (४८) हे सध्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाचे वकील एसव्ही राजू यांनी युक्तिवाद केला की, सोरेन यांची जामिनावर सुटका झाली तर ते पुन्हा असाच गुन्हा करेल.
 
सोरेन यांच्याविरुद्धचा तपास रांचीमधील ८.८६ एकर जमिनीशी संबंधित आहे. ही जमीन सोरेन यांनी बेकायदेशीरपणे मिळवण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. ईडीने ३० मार्च रोजी विशेष पीएमएलए न्यायालयात सोरेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोरेन यांनी रांची येथील विशेष न्यायालयासमोर जामीन याचिका दाखल केली होती आणि आरोप केला होता की त्यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित होती आणि भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडण्याच्या नियोजित कटाचा भाग होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121