मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मिडियावर सक्रिय असते. समाजातील विविध विषयांवर ती कायम व्हिडिओंच्या माध्यमातून भाष्य देखील करत असते, पण बराच काळ चित्रपटांमध्ये न झळकल्यामुळे चाहत्यांनी तिला प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत चक्क क्रांतीने त्याच चाहत्याला त्याची एक चूक दाखवून दिली आहे.
नुकतंच क्रांतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्याने क्रांतीला "तुम्हाला चित्रपट मिळत नाहीत का?" असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाला क्रांतीने अगदी तिच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. क्रांतीच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्याने "तुम्हाला चित्रपट भेटत नाहीत का?" असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना क्रांतीने सर्वप्रथम त्याचं व्याकरण सुधारलं.
क्रांती म्हणाली, "भेटत नाही मिळतं". पुढे तिने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलती तर बंद केलीच शिवाय इतरांची मनंही जिंकली. "उत्तर आहे...कधी कधी नाही आणि कधी कधी मिळतात पण माझ्या लहान मुलांमुळे तारखा अॅडजस्ट होत नाहीत. आता काही चित्रपट करतेय. लवकरच प्रदर्शित होतील".