सई ताम्हणकर झाली ‘बिझनेस वुमन’! सुरू केला ‘हा’ व्यवसाय

    26-Jun-2024
Total Views |
 
Sai Tamhankar
 
 
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या वाढदिवसानिमित्त एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आत्तापर्यंत चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी सई ‘बिजनेस वुमन’ झाली आहे.
 
सई गेल्या काही दिवसांपासून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ‘आवडेल ते बजेट’, ‘घ्या भडंग’ अशा वेगवेगळ्या शब्दांची पोस्ट शेअर करत होती. यामुळे लवकरच तिच्या चाहत्यांना काहीतरी खास सरप्राइज देणार याचा अंदाज प्रेक्षकांना आला होता. २५ जूनला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सईने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राइज दिलं आहे. तिने कपड्यांचा व्यवसाय सुरु केला असून तिने आता कपड्यांचं मर्चंडाइज व्यवसाय लाँच केला आहे. सईने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘मॅडम एस’ ( Madame S ) हा तिचा ब्रँड लाँच केला आहे.
 
अभिनेत्रीच्या या नव्या व्यवसायाचं नाव अगदीच हटके आहे. या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. “क्वीन ऑफ स्यासी ट्यूड” असा या नावाचा अर्थ होतो. दरम्यान, याबद्दल सांगताना सई सांगते, “कपड्यांचा ब्रँड सुरु करणं ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण, चाहत्यांच्या मनात नुसतं राहायचं नाही तर उरायचं आहे आणि या व्यवसायाच्या निमित्ताने मी हे करू शकते त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी हे रिटर्न गिफ्ट आहे.”
 
Sai Tamhankar 
 
तर पोस्ट करताना सई लिहिते, “आपल्या वाढदिवशी व्यवसाय सुरु करणं यासारखा दुसरा मुहूर्त नाही. या मर्चंडाइजला सगळेच खूप जास्त प्रेम देतील यात शंका नाही. मी फक्त कागदपत्रांवर उद्योजिका झाले आहे. पण, यापेक्षा तुम्हा सर्वांचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. याला तुम्ही सगळेच भरभरून प्रेम द्याल आणि असंच काम करण्यासाठी प्रेरणा द्याल अशी आशा आहे. ब्रँडचं नाव काय असावं याचा प्रश्न माझ्या मनात नेहमीच होता. एका जवळच्या मित्राने माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं नाव सुचवलं आणि यामुळे मॅडम एस ( Madame S ) हे नाव ठेवण्याचा मी निर्णय घेतला. ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’सारखा माझा स्वभाव आहे यावरूनच मर्चंडाइज नाव ठेवलं आणि आता हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे”.
 
दरम्यान, सई लवकरच दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये झळकणार आहे. याशिवाय तिच्याजवळ ‘ग्राउंड झिरो’, ‘अग्नी’, ‘डब्बा कार्टेल’ अशा बऱ्याच नव्या प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे.