मुंबई : मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हिंदीतील पहिला दिग्दर्शकीय चित्रपट मुंजा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. कोकणातील मुंजाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आदित्य यांनी केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला तुफान यश मिळाले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘मुंजा’ने तिसऱ्या वीकेंडपर्यंत १०० कोटींचा टप्पा पार केला असून १०० कोटीच्या क्लबमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. १७व्या दिवशी या चित्रपटाने ७.२० कोटींच्या कमाईनंतर देशभरात ८७.३१ कोटीचे नेट कलेक्शन करत आणि ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन १०० कोटींच्या पलीकडे नेले आहे. अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘चंदु चॅम्पियन’ या चित्रपटावर मुंजा भारी पडला आहे.
'मुंज्या'ने पहिल्या आठवड्यात ३६.५० कोटी होते, दुसऱ्या आठवड्यात ३४.५० कोटी कमावले होते. त्यानंतर पंधराव्या दिवशी चित्रपटाने ३.३१ कोटी, सोळाव्या दिवशी ५.८० आणि १७व्या दिवशी ७.२० कोटी, अठराव्या दिवशी २०५० कोटी, एकोणिसाव्या दिवशी २.४८ कोटी कमावले आहे. यानंतर 'मुंज्या'चे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ९२.२९ कोटी आणि ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन १०८.८७ कोटी झाले आहे.